नागपूर व विदर्भातील शुक्रवारच्या (ता. १२) महत्त्वाच्या बातम्या

  • 3 years ago
- नागपूर : जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत गतीने वाढू लागला आहे. शहरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी अकरा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

- नागपूर : विदर्भात मान्सून दाखल झाला असून, यंदा अपेक्षेप्रमाणे लवकर मॉन्सूनचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांचीही लगबग सुरू झाली आहे.

- गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका तरूण शेतकऱ्याची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

- अमरावती : मेळघाट व्याघप्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागामध्ये दोन लहान पिल्लांची शिकार केल्यामुळे चवताळलेल्या अस्वलीने दोन शिकाऱ्यांचा जीव घेतला. उर्वरीत शिकारी गावात पळून गेल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha