sant dnyaneshwar maharaj - sadashivnagar ringan

  • 3 years ago
वारीच्या वाटेवरील परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे गोल रिंगण. गेल्यावर्षी ऑफिसच्या कामातून वेळ काढून मी सदाशिवनगरमध्ये माउलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण बघण्यासाठी आलो होतो. यावेळी वारीतच असल्यानं सदाशिवनगरच्या रिंगणाबद्दल पहिल्यापासूनच उत्सुकता होती. दुपारी एकच्या सुमारास श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंटागणात पोचलो. वारकरी आणि परिसरातील भाविकांनी रिंगण बघण्यासाठी आधीपासूनच गर्दी केली होती.

Recommended