Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
पुणे : आज (24 एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याच दरम्यान अजित पवार यांना काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचा मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. यावेळी अजित पवार यांनी पर्यटकांना धीर देत तुम्हाला महाराष्ट्रात सुखरूप आणायची जबाबदारी आमची आहे, काळजी करू नका. स्पेशल विमान सरकारच्या वतीनं पाठवण्यात आलं आहे. तुम्हाला महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सहकार्य केलं आहे. जिथे शक्य आहे तिथे विमान आणि रेल्वेची सोय करत असल्याची माहिती अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पर्यटकांना दिली. तसंच त्यांना सुखरूप घरी येण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Category

🗞
News

Recommended