कोल्हापूर महापालिका हद्दवाढीला ग्रामीण भागात विरोध असल्याने 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. परंतु प्राधिकरणाने गेल्या 6 वर्षांत एकही रुपया विकास कामांसाठी खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावांच्या विकासासाठी आधी निधी द्या मग हद्दवाढीचा मुद्दा असा निर्णय सर्व पक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीने घेतला आहे.
Category
🗞
News