शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही त्यामुळे आबिटकर यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता वाढली आहे.