भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी आता पुढचा विचार करेल, असं म्हणत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीतच राहण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजप पक्षप्रवेशाला केंद्रातील नेत्यांचा प्रतिसाद होता. मात्र राज्यात विरोध होत असल्याची खदखद देखील खडसेंनी व्यक्त केली.