Kulpachi Chavi Harvali - Pandu Hawaldar(1975) with Dada Kondke & Laxmichhaya

  • 3 months ago
Pandoo Hawaldar

अहो हवालदार ~~
माझ्या कुलुपाची चाबी हरिवलीss
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
ओ माझ्या ट्रँकेची किल्ली हरिवली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली

पंढरपूर च कुलूप लावलाय
माझ्या पेटीला
ग बाई ग माझ्या पेटीला
तोडू नका तुम्ही त्याला हवालदार~~
~~~~
तोडू नका तुम्ही त्याला हवालदार
पहिल्याच भेटीला
ग बाई ग पहिल्याच भेटीला
अवतीभवती मिरवू नका हो
भलती चाबी फिरवू नका हो
नुसती शंका मनात का धरली
हं माझ्या ~~
हं माझ्या, कुलुपाची चाबी हरिवलीss
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली

बहुमोलाचा ऐवज माझा
पडलाय अडकून
बाई ग हिच्यात अडकून
समोर तुम्हाला पाहिलं न बाई मी
~~~~
समोर तुम्हाला पाहिलं न बाई मी
गेले हरखुन ~~
न बाई मी गेले हरखुन
कुणीतरी तुम्ही जाऊन धाडा
माझी चाबी शोधून काढा
टंगळ मंगळ काहो चालवली
ओ माझ्या ~~
ओ माझ्या ट्रँकेची किल्ली हरिवली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली

नव्या भरतीच दिसतंय तुम्ही
कव्हाच मी हेरल
हवालदार, कव्हाच मी हेरल
असं काय बघता खुळ्यासारखं
~~
असं काय बघता खुळ्यासारखं
टक्कुरं का फिरलंय
तुमचं टक्कुरं का फिरलंय
पेटी माझी घेऊन जाते
दुसरी चाबी लावून पाहते
मेहनत का हो फुक्कट घालिवली
न माझ्या ~~

माझ्या कुलुपाची चाबी हरिवलीss
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली
कोतवाल तुम्ही ,
डायरीत हि केस नाही लिव्हली

Recommended