नेपाळमधील पोखरामध्ये रविवारी झालेल्या विमान अपघाताचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यति एअरलाईन्सचे हे विमान लँडिंगच्या केवळ १० सेकंद आधी क्रॅश झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. विमानात ६८ प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्सदेखील होते. या विमानात ५ भारतीय प्रवासी देखील होते. त्यात उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या ४ मित्रांचाही समावेश आहे. हे चौघंही तीन दिवसांपूर्वीच नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. पोखरामध्ये मृतदेह सापडल्यानंतर त्यांची ओळख पटू शकली, त्यानंतर गाझीपूर प्रशासनाने गावात जाऊन याची खातरजमा केली. ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यांच्यापैकी एकाच्या भावाने या घटनेचा व्हिडीओ त्याच्या फेसबुकवर लाइव्ह पाहिल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये विमान लँड होण्याच्या काही क्षण आधी एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केले.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…