Madhya Pradesh ST Accident: या हेल्पलाईनवर कॉल करा आणि माहिती मिळवा | Sakal Media

  • 2 years ago
मध्य प्रदेशात एसटी महामंडळाच्या बस क्रमांक MH 40 N 9848 चा अपघात झालाय. या बस अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर १० ते १२ प्रवासी बेपत्ता आहेत. दरम्यान, अपघातावेळी बसमध्ये नेमके किती जण होते, याची अजूनतरी खात्रीशील माहिती मिळालेली नाही. तरी, या अपघातासंदर्भात माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. तर तिकडे जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही पत्रक जारी करुन अपघाताची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी सकाळी १० ते १०.१५ च्या सुमारास ही बस मध्यप्रदेशातील खलघाट आणि ठिगरीतील नर्मदा नदीच्या पुलावरुन खाली कोसळली. त्यात आता खरगोन, धारचे जिल्हा प्रशासन पोहचलं असून बस क्रेनच्या साहाय्याने बाहे काढण्यात आली असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तरी, आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचंही अभिजीत राऊतांनी आपल्या पत्रकात म्हटली आहे. याशिवाय घटनास्थळी मदतीसाठी 09555899091 हा क्रमांक तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 025/72223180, 025/72217193 हे नंबर जारी केलेत