Nanded Flood Rescue : सीतानदीच्या पुरात अडकलेल्या दोघांची सुटका ABP Majha

  • 2 years ago
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना आणि मन्याड नद्यांना पूर आलाय. मुदखेड तालुक्यातील सीतानदीलाही पूर आलाय. सीतानदीच्या पुरात अडकलेल्या दोघांची तब्बल १२ तासांनंतर सुटका करण्यात आलीय. बारड इथले सावळा शिंदे आणि मुगट रेल्वे स्टेशनचे रेल्वे कर्मचारी दीपक शर्मा पुरामुळे अडकून पडले. कालची रात्र या दोघांनाही पुराने वेढलेल्या झाडावर काढावी लागली. अखेर १२ तासांच्या प्रयत्नांनंतर एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाने या दोघांची सुटका केली.