ब्रह्मकमळ फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Important information about Bramhakamal | Bramhakamal Mahiti

  • 2 years ago
ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हॅलाटा हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते.. हे हिमालयातले फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे.

#lokmatbhakti #bramhakamal #rareflower #flower
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended