Kolhapur: चंद्रकांतदादा, मालोजीराजेंची गळाभेट; कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी

  • 2 years ago
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मालोजीराजे छत्रपती हे दोन नेते शहरातील आठ नंबर शाळेतील मतदान केंद्रासमोर एकत्रित आले. दरम्यान, दोघांनीही गळा भेट घेतली, मात्र यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर चंद्रकांत पाटील निघून गेले आहेत. पोलीस आल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले मालोजीराजे धक्का लागू नये म्हणून कार्यकर्ते पुढे आले. यामुळे तणावात काहीशी भर पडली. अखेर मालोजीराजे यांनी कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना शांत केले. मालोजीराजे आणि पोलिस अधिकाऱ्यांचा ताफाही तेथून निघून गेला. पंधरा मिनिटांनंतर वातावरण पूर्णपणे निवळले. याचा मतदानावर कोणताही परिणाम झाला नाही.
#chandrakantdadapatil, #bjp, #malojiraje, #malojirajekolhapur, #kolhapurnewsupdates,

Recommended