Viral Video | राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष विजय औटी यांनी केली अधिकाऱ्याला मारहाण | Sakal

  • 2 years ago
अहमदनगर - पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये नगराध्यक्ष विजय औटी यांनी मारहाण करत असताना नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता कुमावत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण औटी आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. सचिन राजभोज हे पारनेर नगरपंचायत मध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून काम करतात शहरातील पाणीपुरवठा विभातील बंद पडलेल्या मोटारी जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते ते त्यावेळेस न केल्याने नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांचे कार्य कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.


#ViralVideo #ncp #vijayauti #trendingnow #SharadPawar #AjitPawar #BREAKING #esakal #SakalMediaGroup

Recommended