परभणीत सगळ्यात महाग पेट्रोल; वाहनचालक त्रस्त

  • 2 years ago
इंधन दरवाढीमुळे संपूर्ण राज्यातील वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. संपूर्ण देशात इंधनाचे दर वाढले. मात्र देशात सर्वाधिक दर वाढ असणाऱ्या परभणी जिल्ह्याला महागाईची झळ बसलीये.. सद्यस्थितीला एक लिटर पेट्रोलसाठी ११६.४६ पैसे इतकी रक्कम मोजावी लागत आहे. तर डिझेलसाठी ९९.१३ रुपये परभणीकरांना मोजावे लागत आहे.पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढू लागल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. पाच राज्यातील निवडणुका पार पाडल्यानंतर इंधन दरवाढीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यामध्ये इंधन साठविण्यासाठी डेपो नसल्यामुळे परभणीला उत्तर महाराष्ट्र अथवा विदर्भातून इंधन आणावे लागत आहे. विदर्भातून इंधन आणण्यासाठी जास्त खर्च येत असल्याने मनमाड येथून साडेतीनशे किलोमिटर अंतरावरुन इंधन आणावे लागत आहे. परिणामी खर्च वसूल करण्यासाठी परभणी मध्ये अधिकची रक्कम घेतली जात आहे. पण त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री लागतेय. शासनाने इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा परभणीकरांनी दिला आहे,.

Recommended