'तिच्यासाठी दोन दिवस उपाशी राहिलो, पण तिने

  • 2 years ago
प्रेमात मिळालेला धोका सहन न झाल्याने तरुणाने थेट बस स्टँडवरच जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव बस स्टँडवरची ही घटना आहे. या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही. पण, प्रवासी शेडमध्येच गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलाने तरुणीच्या नावाने फरशीवरच खडूने मजकूर लिहिलाय. या मजकुराच्या आधारावरच हा तरुण कोण होता आणि तरुणी कोण आहे याचा शोध पोलिसांना करायचाय. मी एका मुलीशी प्रेम करत आहे, प्रेम प्रकरणात धोका मिळालाय, दोन दिवस मी उपाशी राहिलो, फक्त पाणी प्यायलो, असं लिहिलेलं आढळून आलं आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी या तरूणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. ओळख पटल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.