राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' प्रमोशनदरम्यान हटके लूक

  • 2 years ago
यावेळी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर इनॉर्बिट मॉलमध्ये 'बधाई दो' चं प्रमोशन करताना दिसले. यावेळी प्रमोशनदरम्यान राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांचा हटके लूक पाहायला मिळाला. दोघेही चाहत्यांसोबत मग्न दिसले. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'बधाई दो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दोन मेनस्ट्रीम कलाकार LGBTQ भूमिका साकारताना दिसले आहेत. 'बधाई दो'मध्ये भूमी पेडणेकर लेस्बियनची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर राजकुमारही गेच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात 'लव्हेंडर मॅरेज' ही कन्सेप्ट दाखवण्यात आली असून चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे.

Recommended