'पत्नीचं मंगळसूत्र 'विकले' अन् चित्रपट तयार केला, आतापर्यंत मिळाले ३९ पुरस्कार'

  • 2 years ago
बीड जिल्हा म्हणजे कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून आज देशभरात या जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे. बीड जिल्ह्यातून अनेक कलावंत आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याच जिल्ह्यातून एक लघुचित्रपट 2016 साली निर्माण झाला. आणि याच लघुपटाचा डंका आता संपूर्ण देशभर वाजत आहे. एचआयव्ही बाधितांच्या जीवनावर आधारित 'उष:काल होता होता...' या लघुपटाची निर्मिती लेखक एजाज अली यांनी केली. आतापर्यंत या चित्रपटाला स्पर्धेत 39 विविध पुरस्कार मिळाले आहेत. आणि आजही हा चित्रपट विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावत आहे. लघुचित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत यांच्याशी चर्चा केलीये आमचे प्रतिनिधी रोहित दीक्षित यांनी....

Recommended