संसदेत काँग्रेसवर तोफ डागताना मोदींकडून शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले...

  • 2 years ago
करोना संकटात मुख्यमंत्र्यांसोबत आपण २३ बैठका केल्या. विस्तृत चर्चा केल्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि केंद्र सरकारची माहिती यातून सरकारने निर्णय घेतले गेले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार असो, किंवा स्थानिक प्रशासन असो, सर्वांनी मिळून करोना विरोधी लढाईत प्रयत्न केले. पण काहींना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने करोना संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीला काँग्रेस नेते स्वतः उपस्थित राहिली आणि इतर पक्षांनीही उपस्थित राहू नये, यासाठीही प्रयत्न केले गेले. आणि बैठकीचा बहिष्कार केला. पण हा युपीएचा निर्णय नव्हता. पण मी शरद पवारांचे आभार मानतो. शरद पवार उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या बहुमूल्य सूचना दिल्या. शरद पवारांसह तृणमूल काँग्रेस आणि इतर काही पक्षही या बैठकीला उपस्थित राहिले. करोनाचे हे संकट मानवावर होते, तरीही तुम्ही बैठकीवर बहिष्कार घातला. हे कोणाच्या सल्ल्याने करते काँग्रेस? यामुळे तुमच्याच पक्षाचे नुकसान होतंय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

Recommended