कधीही न हरवणारा आवाज मागे सोडून लता दीदी अनंतात विलीन

  • 2 years ago
महान गायिका लता मंगशकरांवर शिवाजी पार्कमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कधीही न हरवणारा आवाज मागे सोडून लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत. चित्रपट सृष्टीतील दिग्गज , राजकीय मंडळी , तसेच सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भावना दाटून आले होते. प्रत्येकाचं हद्य भरून आलं होत. लतादीदींनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी आणलं गेलं होत. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जवळपास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.. तर लता दीदींच्या घरा बाहेर चाहत्यांनीही खुप गर्दी केली होती. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून सर्वच दिग्गजांचा मंत्री मंडळातील सर्वच मंत्र्यांनी, नेत्यांनी लतादीदींना शिवाजी पार्क येथ श्रंद्धांजली वाहिली. सर्वांनीच जड मनाने लता दीदींना श्रंद्धांजली वाहीली...लता मंगेशकरांच्या जाण्याने सुरांची दैवी शक्ती हरपल्याची भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला असं म्हणायला हरकत नाही. आज ही महाराष्ट्राच्या कन्या आपल्यात नाही. पण त्यांनी गायलेल्या गाण्यांमधून कायम अजरामर राहतील... त्यांची गाणी , त्यांचा आवाज आणि त्यातून जिवंत राहणारी त्यांचं अस्तित्व कायम सर्वांना जाणवत राहील हे नक्की... अशा या महान गायिकेला महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन कडून भावपुर्ण श्रंद्धांजली.