मुख्यमंत्री पदावरुन नांदेडमध्ये भास्करराव पाटील खतगावकरांचं मोठं वक्तव्य

  • 2 years ago
'स्वर्गीय विलासराव देशमुख यांची नाराजी ओढवली नसती तर अशोकराव तुम्ही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले असते,' असं वक्तव्य माजी खासदार भास्करराव पाटील यांनी केलं आहे. अशोक चव्हाण यांचे सख्खे मोठे मेहुणे असलेल्या भास्करराव पाटील यांनी नांदेडमध्ये जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. त्यामुळे एकेकाळी नांदेड-लातूर मधली कटुता आता पुन्हा नव्याने चर्चेत येणार आहे. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून चांगलाच प्रतिसाद दिला. दरम्यान, महसूल आयुक्तालय नांदेडला करावे असा ठराव तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्या ठरावामुळेच स्वर्गीय विलासराव देशमुख नाराज झाले आणि अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले असा दावा भास्करराव पाटीलांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे.