नाईट कर्फ्यूतही नाटक सुरू आहे, नाटकाला येण्याचं अभिनेता भरत जाधवचं आवाहन

  • 2 years ago
#ActorBharatJadhav #NightCurfew #StateGovernment #MaharashtraTimes
प्रेक्षक हो नाटक पहायला या! असं आवाहन अभिनेता भरत जाधवने नाट्य रसिकांना केलंय. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर करताना रात्रीची संचारबंदी लावली आहे. मात्र नाटकांना 50 टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. पण रात्रीच्या संचारबंदीने प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय, त्या पार्श्वभूमीवर भरत जाधवने प्रेक्षकांना हे आवाहन केलंय. नाटक संपल्यावर नाटकांची तिकीटं घरी जाईपर्यंत जपून ठेवा आणि बाहेर पडताना घोळक्याने बाहेर पडू नका असं आवाहनही भरत जाधवने केलंय