पुण्यातल्या आर्किटेक्ट जोडप्याने गावात उभारलाय 'मातीमहल'

  • 3 years ago
मावळ तालुक्यातील वाघेश्वर या गावी तरुण जोडप्याने जागा निवडण्यापासून ते मातीचे घर बांधून त्यात चूल पेटवण्यापर्यंत कष्ट केले.
पुण्यात राहणाऱ्या सागर शिरुडे आणि युगा आखारे यांनी मातीचं दुमजली घर बांधलंय.
शहरातून गावात जाऊन ५ महिने त्यांनी नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला.
तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वाघेश्वर गावात अभ्यासपूर्ण प्रयोग केला.
तौक्ते वादळाचा सामना करुनही हे बांबू आणि मातीचं घर उभं आहे.
निसर्गाच्या सानिध्यात युगा आणि सागर कुटुंबियांसोबत राहतात.
या घरात टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.
दारूच्या रंगीबेरंगी बॉटल वापरून सूर्यकिरणांच्या दिशेने घरात प्रकाश येतो.