Shri Siddhanath Devi | म्हसवड - सिध्दनाथ-जोगेश्वरी यात्रेत भाविकांची मोठी गर्दी | Sakal Media

  • 2 years ago
Shri Siddhanath Devi | म्हसवड - सिध्दनाथ-जोगेश्वरी यात्रेत भाविकांची मोठी गर्दी | Sakal Media
म्हसवड - सातारा जिल्ह्यामधील ( Satara District )म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी (Shri Siddhanath Devi)जोगेश्वरी देवस्थानच्या यात्रेची आज रविवारी पाकळणी झाली. भाविकांची मंदीरातील श्रीच्या मुर्तीसह रथाचे दर्शनास मोठी गर्दी झाली होती. गेल्या रविवारी या देवस्थानची रथ मिरवणूक यात्रा होती. कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे प्रशासनाने यात्रा भरविणे व रथाची नगरप्रदक्षणा मिरवणुकीस प्रतिबंद आदेश लागू केला होता. परगावच्या भाविकांनाही म्हसवड शहरात प्रवेश बंदी करण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयामुळे म्हसवड येथील रथयात्रेचा सुमारे पाच लाख भाविकांना उपस्थित राहून रथ मिरवणुकीस मंदिरातील श्रीच्या मुर्तीचे दर्शनाच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते. भाविकांना यात्रेस येता आले नसल्यामुळे तेच भाविक आज रविवारी श्रीच्या रथ यात्रेच्या पाकणीस मोठ्या संख्येने मानाच्या काट्यासह उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घेतला. (व्हिडिओ : सलाउद्दीन चोपदार)
#Mhaswad #SataraDistrict #ShriSiddhanathDevi #MhaswadinSataraDistrict

Recommended