Mahabaleshwar : दवाखाण्यात उपचारासाठी डालीतून पायपीट | Sakal Media |

  • 3 years ago
कास (सातारा) : गेल्या चाळीस वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्णच असल्याने कोंडोशीतील (Mahabaleshwar) लोक हलाखीचे जीवन जगत आहेत. कोंडोशी गावकऱ्यांसाठी ही एक परंपरा होऊन गेलीय. 160 ते 170 लोकसंख्या असलेल्या गावात रस्त्याचे काम ही अर्धवट झाले आहे, अजूनही कोंडोशीपर्यंत कच्चा रस्ता सुद्धा गेलेला नाहीये, दरवर्षी रस्त्याचे काम मंजूर होऊन येते, परंतु ते सुद्धा अर्धवट! कुमठे गावापासून फक्त 6 किमी अंतरावर असलेले हे कोंडोशी गाव आणि या 6 किमी कामासाठी जर 40 वर्षे लागत असतील, तर प्रशासनासाठी ही लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल, अशी ग्रामस्थांची म्हणणे आहे.
(व्हिडिओ : सूर्यकांत पवार)
#marathinews #breakingnews #mahabaleshwar #sakal #esakal #satara #sakalnews #sakalmedia