Nilanga: मांजरा नदीचे पाणी पात्रा बाहेर

  • 3 years ago
निलंगा (जि. लातूर) : धनेगाव (ता.केज) येथील मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले असून नदीला मोठा पूर आला आहे. दोन दिवासापासून पाण्याचा प्रवाह वाढत असून मांजरा प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले असले तरी पाणी हळूहळू वाढू लागले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस, या पीकाचे नुकसान झाले असून पीके. पाण्यात वाहून गेली आहेत. या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील 30 गावाना बसला आहे. त्यामध्ये मांजरा नदीकाठचे 13, तर तेरणा नदीकाठचे 17 गावाचा समावेश आहे. तेरणा नदीलाही मोठा पूर आला आहे. यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे पीकाचे नुकसान झाले आहे. (व्हिडिओ - राम काळगे )
#manjarariver #nilanga #manjarariveroverfull #rainupdates #heavyrainfall

Recommended