Nanded: नांदेडला राष्ट्रध्वज बनविणा-या कारागीरांच्या घरांना पाण्याचा विळखा

  • 3 years ago
Nanded: सध्या मी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वस्त्रागार परीसरात उभा आहे. याच ठिकाणी देशभरात अभिमानाने फडकणारा राष्ट्रध्वज तयार होतो. या परीसराला देखील पावसाच्या पाण्याचा जबर तडाखा बसला आहे. बुधवारी पावसाने उघडीप दिली असली तरी, खादी वस्त्र तयार करणारे कारागिर वास्तव्यास असलेल्या परीसरात आजही गुडघ्या इतके पाणी साचलेले आहे. कारागिरांची घरे अतिशय पुरातन व खोलगट जागेत आहेत. परीसरातील ट्रेनेज पूर्णपणे गाळाने भरले आहे. त्यामुळे त्यांना घर सोडुन वास्तव्यासाठी इतरत्र जागे लागत आहे. परंतू यातील अनेक कागारिरांची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांच्यासमोर कुठे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या या समस्येकडे अद्यापतरी कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही. मराठराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी देखील खादीला कोरोनातून सावरण्यासाठी व कारागिरांना केंद्राकडून आर्थिक मदतीची मोठी आशा होती. परंतू तसे काही ही झालेले नाही.(व्हिडिओ : शिवचरण वावळे)
#nanded #marathwada #heavyrainfall #rainfall #nandedrainupdates #marathwadarainupdates