नांदेड शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचे बिल वाढवण्यासाठी डॉक्टरने एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर मृत्यूनंतरही उपचार सुरू ठेवल्याचा आरोप केला जातोय. सिडको भागात राहणारे शिक्षक अंकलेश पवार हे महिनाभरापासून कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. त्यांना वेळेवर योग्य उपचार न करता केवळ बिलाची मागणी डॉक्टर करत होते. कोरोनामुळे पवार यांचा 21 एप्रिल रोजी मृत्यू झाल्यावरही केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांचा मृत्यू 24 एप्रिल रोजी हॉस्पिटलकडून घोषित करण्यात आला. संपुर्ण पैसे घेतल्यानंतर त्यांचा मृत झाल्याचं सांगण्यात आले.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....