सैराट फेम Akash Thosar ला मिळणार बॉलीवूड मध्ये एंट्री। Radhika Apte सोबत असणार दिसणारं

  • 3 years ago
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात परशा ही व्यक्तिरेखा साकारणारा आकाश ठोसर एका रात्रीत स्टार झाला. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. ‘सैराट’नंतर त्याने महेश मांजरेकर यांच्या ‘एफ यू’ या चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर आता आकाश लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटेसोबत आकाश झळकणार असल्याचं कळतंय. आकाश यात राधिकाच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यातच त्याची शूटिंग पूर्ण झाली. यामध्ये चार लघुकथा असून चार वेगवेगळे दिग्दर्शक या लघुकथांचं दिग्दर्शन करणार आहेत. तर आकाश आणि राधिकाच्या कथेचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. विशेष म्हणजे ही लघुकथा राधिकाने स्वत: लिहिली आहे. रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended