फिट्टमफाट 'फायनल'चा पिक्चर अजून बाकी | India Vs England test series | Sports News

  • 3 years ago
लहानपणी खेळत असताना विशेषतः ग्रामीण भागातील मुलं हमखास एक शब्द वापरतात फिट्टमफाट... आज असाच प्रकार क्रिकेटच्या मैदानावर पहायला मिळाला.. भारताने इंग्लडला ३१७ धावांनी हरवलं.. आणि फिट्टमफाट झाली.. अनेकांना फिट्टमफाटचा अर्थ कळलाच असेल.. साध्या भाषेत बरोबरी, उधारी मिटली असंच काहीसं.. सामना जिंकल्यावर भारताचे खेळाडू जेव्हा इंग्लिश पाहुण्यांना हात मिळवत होते.. तेव्हा माझ्या मनात आलेला हा पहिला शब्द होता.. फिट्टमफाट.. याच कारण म्हणजे शहर तेच, मैदान तेच होतं, परिस्थिती तीच होती, संघाचे कर्णधार तेच होते.. फक्त जिंकणारा संघ हा वेगळा आहे... मालिकेत इंग्लडचा संघ १-० ने पुढे होता.. पहिला सामना त्यांनी मोठ्या फऱकाने जिंकला होता.. अगदी तसंच काहीसं आता घडलं... मालिकेत बरोबरी झाली.. आणि सामना मोठ्या फरकानेच जिंकला.. तोही एकतर्फी.. आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.. म्हणून भारत आणि इंग्लडचं हे फिट्टमफाट झालं..
#lokmat #Sportsnews #indiaVsEngland
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat