कुत्र्याला चौथ्या मजल्यावरून का फेकले? Dog Thrown From The Fourth Floor In Pune | Maharashtra News

  • 3 years ago
क्रूरतेची परिसीमा गाठावी अशी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. एका भटक्या कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. या जखमी कुत्र्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणात प्राणी प्रेमी आणि खासदार मेनका गांधींनी आता लक्ष घातलंय. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत हा प्रकार घडला. एका अज्ञाताने सात महिन्यांच्या भटक्या कुत्र्याला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात जखमी झालेल्या कुत्र्याला उपस्थितांनी रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता. मग याप्रकरणी फरीनजहाँ शेख या महिलेने सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला. निष्पाप मुक्या प्राण्याचा असा गळा घोटल्याची बाब खासदार मेनका गांधींपर्यंत पोहचली. त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांना फोन करून अज्ञातास अटक करण्याच्या सूचना दिल्यात.

#Lokmat #Dog #Pune #DogThrown #Dogeffect
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended