शिवसेनेची आता पंतप्रधानपदावर नजर पण का? Shiv Sena | PM Modi

  • 3 years ago
५४ वर्षात शिवसेनेने काय साधलं, कशा पद्धतीने साधलं या सगळ्याची चर्चा खूप होते पण काल पक्षाच्या वर्षांपनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा  पंतप्रधान करण्याचे ध्येय जाहीर केले. मुळात महाराष्ट्रात वैचारिक दृष्टीने त्यांच्या थेट उलट असणाऱ्या काँग्रेससोबत त्यांना आघाडी करावी लागली असताना देशाच्या पंतप्रधानपदी जाण्याची त्यांची भाषा काहीशी आश्चर्यकारक होती. राजकारणात काहीही अशक्य नसतं. चंद्रशेखर, व्हीपी सिंग आणि देवेगौडा हे एकाच राज्यात सत्तेत असूनही देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते ... अर्थात त्यावेळी राजकीय गणितं तशी होती. उध्दव ठाकरे यांनाही अशाच गणितासाठी आपल्या पक्षाला तयार करायचं असेल, असंही म्हणायला हरकत नाही. पण उध्दव ठाकरे यांच्या कालच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला चांगलंच कोंडीत पकडलंय हे नक्की. दोन्ही पक्ष हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे पक्ष आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करूनही शिवसेनेनी आपला हिंदुत्वाचा अजेंडा आपण सोडून दिला आहे असं म्हटलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर आता केंद्रातही तसाच काहीसा प्रयोग करण्याचा विचार उध्दव ठाकरे यांच्या मनात नसेल हे कशावरून ? या सगळ्याबाबतचा आजचा हा खास रिपोर्ट
#shivsena #primeminister #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended