भारतात पहिल्यांदाच महिलेला फाशी, गुन्हा काय? Uttar Pradesh Shabnam Case |

  • 3 years ago
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत हजारों गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या सर्वच गुन्हेगारांना फाशी झाली असं नाही.. त्यातील केवळ काही लोकांनाच फाशी देण्यात आली.. याचा ठोस आकडा उपलब्ध नसला तरी काहीच्या मते, हा आकडा १००० च्या पार गेलेला आहे.. तर काही रिपोर्ट सांगतात आतापर्यतं केवळ १७२ लोकांनाच फाशी देण्यात आली.. तर काहींच्या मते हा आकडा १०० च्या आत आहे... पण स्वातंत्र्यांनंतर आतापर्यंत कधी महिलेला फाशी देण्यात आलेली नाहीये.. पण, भारतात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला तिच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशी देण्यात येणार आहे. यासाठी मथुरा कारागृहात तयारी सुरू करण्यात आलीय. उत्तरप्रदेशातील अमरोहा येथील शबनम नावाच्या महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनमने प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच घरातील सात लोकांची हत्या केली होती.. मथुरा तुरूंग प्रशासनाने फाशीच्या दोराची ऑर्डर दिली आहे. निर्भया कांडातील दोषींना फासावर लटकवणारा जल्लाद पवन याने फाशी घराची पाहणीही केल्याचं सांगितलं जातंय. मात्र, फाशीची तारीख अजून ठरलेली नाही..
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended