अकोल्याचा कावड महोत्सव, हजारो शिवभक्तांमध्ये उत्साह | Kavad | Akola

  • 3 years ago
अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.
शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात कावड व पालखींचे स्वागत करण्यात येत आहे.खांद्यावरून सर्वाधिक संख्येने भरणे आणण्यामध्ये जुने शहरातील काही प्रमुख कावड मंडळांचा समावेश आहे. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावली. भरपावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Akola #Kavad #IndianFestivals
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19