अरूण जेटली यांचा जीवनपट | Arun Jaitley | New Delhi

  • 3 years ago
अरुण जेटली यांचा अल्पपरिचय

28 डिसेंबर 1952 रोजी अरुण जेटली यांचा जन्म झाला. दिल्लीतच शिक्षण झालं. विद्यार्थीदशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवा नेता म्हणून त्यांनी ओळख मिळवली.
वडील पेशाने वकील असल्याने त्यांच्यात तो सभाधीटपणा, वाक्चातुर्य, लढवय्या स्वभाव, नेतृत्व गुण आपोआप आले. त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीतील सेंट झेवियर्समध्ये झालं. पुढे दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली.
1974 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापिठातून कायदा शाखेतील पदवी मिळवली. दिल्ली विद्यापीठात अभाविपकडून 1974 मध्ये विद्यार्थी नेता म्हणून निवड करण्यात आली. याच काळात त्यांच्यातील नेतृत्व गुण समोर आले आणि त्यांचा त्यांनी विद्यार्थांच्या उत्कर्षासाठी अत्यंत खुबीने वापर केला
आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने तुरुंगवास भोगला. 1973 मध्ये राज नारायण आणि जेपी नारायण यांनी भ्रष्टाचाराविरोधात उघडलेल्या मोहिमेत जेटली एक प्रमुख युवा नेते होते. आणीबाणीनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर अरुण जेटलींनी जन संघात प्रवेश केला.
चार्टर्ड अकाऊंटंट होण्याची इच्छा असलेले जेटली वकील झाले. सुप्रीम कोर्ट आणि देशातील विविध हायकोर्टांमध्ये त्यांनी वकिली केली. 1990 मध्ये त्यांना दिल्ली हायकोर्टाने वरिष्ठ वकील म्हणून मान्यता दिली.
व्ही. पी. सिंह सरकारकडून 1989 मध्ये जेटलींची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून निवड करण्यात आली. बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली.
जनता दलचे नेते शरद यादव, काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी जेटलींनी वकिलीही केली.
पेप्सिको विरुद्ध कोकाकोला हे प्रकरणही जेटलींनी हाताळलं. कायदेमंत्री असताना जेटलींनी पेप्सीकोसाठी खटला लढवला आणि हिमालयातील रस्त्यांवर जाहिरात करणाऱ्या आठ कंपन्यांना दंड ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
जेटलींनी 2009 मध्ये वकिली थांबवली. राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
भाजपमध्ये अनेक पदांवर जेटलींनी काम केलं. 2014 पर्यंत ते जनतेमधून कोणतीही नि

Recommended