सहा वर्षानंतरही दाभोलकरांच्या खुनाचे मुख्यसूत्रधार मोकाट | Dr. Narendra Dabhelkar | Pune

  • 3 years ago
पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) अध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या खुनाला सहा वर्षे पुर्ण झाली. दाभाेलकरांच्या खुनाच्या आराेपात सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना अटक करण्यात आली. परंतु यामागील मुख्य सूत्रधार अद्याप माेकाटच आहेत. हाच प्रश्न उपस्थित करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने दाभाेलकरांचा खून झाला त्या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निदर्शने करण्यात आली. यावेळी तरुण माेठ्यासंख्येने उपस्थित हाेते.

20 ऑगस्ट 2013 राेजी सकाळी 8 च्या दरम्यान फिरायला बाहेर पडलेल्या डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांची विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. त्यानंतर प्रत्येक वर्षी अंनिसचे कार्यकर्ते तसेच विवेकवादी नागरिक विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमून निदर्शेने करतात. गेल्या काही काळात दाभाेलकरांच्या खुनाच्या आराेपावरुन अनेकांना अटक करण्यात आली. परंतु या हत्येमागील मुख्यसुत्रधार अद्याप माेकाटच आहे. त्यामुळे दाभाेलकरांच्या खुन्यामागील मुख्यसुत्रधाराला कधी अटक करणार ? असा सवाल आज उपस्थित करण्यात आला.

दाभाेलकरांच्या कन्या मुक्ता दाभाेलकर म्हणाल्या, तपास एका टप्प्यापर्यंत पाेहाेचला आहे. काेण खुनी आहे हा कट कसा रचला याबाबत अनेक गाेष्टी समाेर आल्या आहेत. आठ लाेकांना अटक करण्यात आली आहे. परंतु यामागील सुत्रधार काेण हे अद्याप समाेर आलेले नाही. हा खून ही एकमेव घटना नाहीये तर या सारखे तीन खून झाले आहेत. नालासाेपारा येथे सापडलेला शस्त्रसाठा, काही चित्रपट पटले नाही म्हणून चित्रपटगृहांवर हाेणारे हल्ले या सगळ्या घटना एकाच विचारधारेच्या लाेकांनी घटवून आणल्या आहेत. त्यामुळे केवळ विवेकवाद्यांच्या खुनापर्यंत हे थांबत नाही तर हा विषय प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पाेहचला आहे. दाभाेलकरांच्या खुनामागील सुत्रधार पकडले जात नाही ताेपर्यंत समाज सुरक्षित पद्धतीने जगू शकेल असे वाटत नाही. सूत्रधार पकडण्यासाठीचा लढा यापुढेही चालू राहील. खुनाच्या चार्चशिटमध्ये सुत्रधार काेण आहे याविषयी स्पष्ट निर्देश तसेच संघटनांची नावे लिहीण्यात आली आहेत. काेणती पुस्तकं वाचल्याने डाेकी भडकली याबाबत सांगण्यात आले आहे. असे असताना सराकारने जी इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे ?

Recommended