Lokmat International News | Hafiz Muhammad Saeed चा खतरनाक मनसुबा तयार करतोय बाल दहशतवादी | Lokmat

  • 3 years ago
पाकिस्तानमधील जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या नुकत्याच इस्लामाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात एका मुलाच्या हातात बंदूक असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. जमात-उद-दावा संघटनेचा आणखी एक म्होरक्या सदाकत याचा हा मुलगा असून खेळण्या-बागडण्याच्या वयात सदाकतने मुलाच्या हाती बंदूक सोपवली आहे. मुलाच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या पोस्टर ‘कश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे आणि कश्मीर स्वतंत्र करण्यासाठी आम्ही संघर्ष करू’, असे त्यावर लिहिलेले होते. जमात उत दावा पाकिस्तानच्या विविध मदरस्यातून लहान मुलांना भारत आणि अमेरिके विरोधात चिथावणी दिली जाते. जास्तीत जास्त मुलांना कश्मीर आणि भारत विरोधात सामील करून घेण्यासाठी दावाने मोहीम सुरू केली असून हे छायाचित्र त्याच मोहिमेच्या प्रचार आणि प्रसाराचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended