Lokmat Sport | Afridi चा राष्ट्रीय ध्वजा सोबत फोटो | परंतु चांद ताऱ्या सोबत नाही तर तिरंग्यासोबत

  • 3 years ago
स्विर्त्झलँडच्या सेंट मॉर्टिजमध्ये खेळल्या गेलेल्या आईस क्रिकेट सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरले होते.या सामन्यानंतरचा आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहिद अफ्रिदीने भारतीय चाहत्यां सोबत फोटो काढले. त्यावेळी एका तरुणीच्या हातात असलेले तिरंग्या सोबत आफ्रिदीनं फोटो काढला.आफ्रिदीने भारताच्या तिरंग्याबाबत दाखवलेलं प्रेम आणि आदर पाहून भारतीयांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्विर्त्झलँडमधील आल्प्स पर्वतरांगाच्या कुशीत या आईस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि इतर देशातील अनेक क्रिकेट चाहते स्विर्त्झलँडला पोहोचले होते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews