गौतम बुद्धांच्या बोधी वृक्षाखाली बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ | Lokmat News

Lokmat

by Lokmat

0 views
बिहारच्या बोधगया जिह्यातील बैद्धांचा धार्मिक स्थळ असलेल्या महाबोधी विहार परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा हे बॉम्ब सापडलेल्या ठिकाणा पासून जवळच असलेल्या मठामध्ये थांबले आहेत. या ठिकाणी एक स्फोट झाल्या नंतर तपास मोहिमेदरम्यान स्थानिक पोलिसांनी हा बॉम्ब आढळून आला आहे. दरम्यान, 2013 साली महाबोधी मंदिराजवळ सीरियल ब्लास्ट झाले होते. त्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतर महाबोधी मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा एकदा याच ठिकाणी बॉम्ब सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews