अमेरिकेने पुन्हा निक्षून सांगितले हाफिज सईद हा दहशतवादीच ! | Lokmat Marathi News Update

  • 3 years ago
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान चे पंतप्रधान शाहीद अब्बासी यांनी मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्ताना त कोणताही गुन्हा दाखल नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याने आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही. कोणी तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असेही शाहीद अब्बासी म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असेही हिथर नॉर्ट यांनी सुनावले आहे.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended