याला म्हणतात हटके प्रपोस। खात्री आहे असे तुम्ही कधीच पाहिलं नसेल पहा हा विडिओ | Lokmat News

  • 3 years ago
वैमानिकाचं प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणानं आपल्या गर्ल फ्रेंडला हटके पद्धतीनं मागणी घातली आहे. गोठलेल्या तलावाच्या पृष्ठभागावर अक्षर कोरुन त्यानं आपल्या गर्ल फ्रेंडला प्रपोज केलं आहे. या भन्नाट प्रपोजलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गैविन बेकर असं या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचं नाव आहे. गैविननं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं गोठलेल्या तलावावर ‘हार्ट’ आकार कोरून ‘मॅरी मी’ असं लिहिलं होतं. ही अक्षरं २५ फूट मोठी होती. हे हटके प्रपोजल बर्फावर कोरायला त्याला ४ तास लागले. त्यानंतर आपली प्रेयसी ऑलिवियाला हिला हॅलिकॉप्टरमध्ये बसवून त्यानं ठराविक उंचीवर तिला नेलं. तिथून खाली पाहिल्यावर गैविननं गोठलेल्या तलावात कोरलेलं प्रपोजल तिला दिसलं. मग काय क्षणाचाही विलंब न करता ऑलिवियालानं ताबडतोब गैविनला होकार दिला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended