Lokmat Health Tips | आयुष्यभर तुम्हाला निरोगी रहायचंय मग द्या दिवसातून फक्त ३ मिनिटांचा वेळ | Lokmat

  • 3 years ago
दिवसातून आपण जर फक्त तीन मिनीटे जरी स्वतःसाठी खर्च करु शकलो तरी नक्कीच आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.त्या साठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी घरी किंवा ऑफिस मध्ये लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा.ऑफिस मध्ये थोड्या वेळाने उठून फिरा. फोनवर बोलताना खुर्चीवर बसून न बोलता चालत बोला. कंप्म्युटर समोरून उठा आणि बाहेर एक फेरी मारून या.एकाच वेळी खूप खाऊ नका. थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा.
आहारात फळांचा समावेश करा.चहा घेण्यासाठी ऑफिस बाहेर पडा. खुर्चीवर बसून चहा घेऊ नका. खुर्चीवर बसून शक्य ते व्यायामप्रकार करा. मान-पाठ उजवीकडे डावीकडे वळवा.कंबरेच्या मागे दोन्ही हात नेऊन तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended