सापडला आजच्या काळातील लखोबा लोखंडे जो स्वतः पोलिस खात्यात आहे | Latest Lokmat News

  • 3 years ago
डोंबिवलीच्या एका पठ्ठ्यानं एक दोन नव्हे, तर चक्क सात बायकांशी विवाह केलाय. त्या महाभागाचं नाव आहे सूर्यकांत कदम.
धक्कादायक बाब म्हणजे डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात तो कामाला होता. बायको सुचिता हिच्या सोबत तो कल्याणच्या चिंचपाडा भागातल्या बालाजी पॅराडाईज इमारतीत राहत होता. सुचिताचा 1992 मध्ये सूर्यकांतसोबत विवाह झाला होता.त्याआधी 1986 मध्ये प्राची .1993 मध्ये काईबाई 1995 मध्ये राजश्री 1998 मध्ये हेमा ,2007 मध्ये धनश्री आणि 2014 मध्ये सविता नावाच्या महिले सोबत त्यानं लग्न केलं. यापैकी दोघींचे निधन झालंय. तर उर्वरित पाच बायका हयात आहेत. या आधुनिक 'लखोबा लोखंडे'नं आपल्या जाळ्यात ओढलेल्या सातही बायका नोकरी करणाऱ्या होत्या. याबाबत सुचितानं कल्याण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दखल केली आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी कदमला निलंबित केलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended