नागपूर हिवाळी अधिवेशन : मंत्री तुपाशी पोलिस मात्र उपाशी | Lokmat News

  • 3 years ago
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट जेवण दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.
सध्या विधीमंडळ परिसर, अवतीभवतीचे रस्ते,मोर्चे अडवले जातात ते पॉइंट्सवर सुमारे 2 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर नागपूर शहरातही 3 हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. या सर्व पोलीस कर्मचा-यांना ते तैनात असलेल्या ठिकाणीच पुरेसं जेवण दिलं जाईल असा दावा नागपूर पोलिसांनी केला होता.जेवणात चपात्या, दोन भाज्या, डाळ, भात, सलाड, लोणचं आणि एक मिठाई असा मेनू निश्चित करण्यात आला होता. मात्र विधीमंडळाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या ताटात फक्त वरण आणि भात एवढेच खाद्य पदार्थ होते. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचा-यांना अर्धपोटीच दिवस काढावा लागला. गंभीर बाब म्हणजे दुपारचं जेवणही अनेक पोलिसांना दुपारनंतर साडे तीन वाजता दिलं गेलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews