गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ काय ते पाहा हा वीडियो | Lokmat Marathi News

  • 3 years ago
गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ आले आहे. ते कोणीही रोखू शकत नाही. विधान सभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय नक्की आहे’, असा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. `भाजपला जनतेसाठी काय करायचे आहे, हे अजून ते सांगू शकलेले नाहीत. उलट निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस 10 दिवसांमध्ये शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी धोरण तयार करेल’,.जीएसटी’च्या मुद्यावरूनही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. `जीएसटी’ म्हणजे हा `गब्बर सिंग टॅक्स’ आहे, असे ते पुन्हा म्हणाले. `आम्हाला जीएसटी हवा आहे, गब्बर सिंग टॅक्स नको’, असेही ते म्हणाले.गुजरातमध्ये जर एखाद्या आईला, आपल्या मुलाला इंजीनिअर बनवायचे असेल तर लाच द्यावी लागते’. सध्या शेतकर्यांची अवस्था बिकट आहे. असे असताना मोदींनी 10 उद्योगपतींचे 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा आरोपही त्यांनी केला. `देशाच्या पंतप्रधानाच्या खुर्चीचा काँग्रेस आदर करते. काँग्रेसमध्ये कोणीही पंतप्रधानांसाठी चुकीचा शब्दप्रयोग करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र आमच्याबाबत काहीही बोलू शकतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended