मुलगी वयात आली की पार पाडली जाते ही प्रथा पाहून व्हाल थक्क | Culture of India | Lokmat News

  • 3 years ago
मुलगी वयात आली,की प्रत्येक राज्य वेगवेगळ्या प्रथा पाळतं.जेव्हा सॅनेटरी पॅडसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा महिलांना पाळीच्या दरम्यान अनेक समस्यांना तोंड द्याव लागायचं. त्यामुळे त्यांच्या त्या काळात त्यांना थोडा आराम देण्यासाठी काही राज्यांनी वेगवेगळ्या परंपरा सुरू केल्या. त्याने त्या महिलेचा त्रास तर कमी झालाच पण मुळात मी काही चूक केलीली नाही असा समज नष्ट होण्यास मदत झाली.कर्नाटकात महिलेला 'पहिली मासिक पाळी' आली की मोठा उत्सव असतो. घरातल्या आजूबाजूच्या महिला तिला ओवाळतात, तिची आरती करतात. तिच्यासाठी गाणी गातात. यात तीळ आणि गुळापासून बनणारा 'चिगली उंडे' हा पदार्थ खाऊ घातला जातो.तामिळनाडूमध्येही 'पहिली मासिक पाळी' ही एका सणासारखी साजरी केली जाते. 'मंजल निरट्टू विज्हा' असं त्यांच्या परंपरेचं नाव आहे. ही परंपरा अगदी लग्नसमारंभासारखी असते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews