• 3 years ago
गरिबांचे सरकार असे सांगत मोदी सरकार सामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवते. मात्र हिंदुस्थानातच एका शहरात सिमेंटचे पोते आठ हजार रुपयांना विकत मिळते. अरुणाचल प्रदेशमधील विजयनगरमध्ये ही परिस्थिती आहे.चांगलांग जिल्ह्यातील विजयनगर शहरात जेमतेम दीड हजार नागरिक राहतात. शहरात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधाही पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही. थेट विजयनगरला जाण्यासाठी एकही चांगला रस्ता उपलब्ध नाही. सरकारी हेलिकॉप्टर सेवेद्वारे शहरात गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र बेभरवशाच्या हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवा दररोज चालवणे कठीण आहे. नागरिक स्वतःच्या पाठीवर लादून सामानाची पोती घरी नेतात.प्रतिकूल परिस्थिती असलेल्या विजयनगरमध्ये सिमेंटच्या एका पोत्यासाठी आठ हजार रुपये मोजावे लागतात. घरोघरी शौचालय ही मोदी सरकारची योजना राबवण्यासाठी लोकांना आठ हजार रुपये दराने सिमेंटचे पोते घ्यावे लागत आहे. एक किलो सिमेंटसाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. शौचालय योजनेसाठी केंद्राकडून 10,800 रुपये आणि अरुणाचल प्रदेश सरकारकडून 9,200 रुपये अनुदान प्रत्येक घराला दिले जात आहे. लोकांना 20 हजार रुपयांचे हे अनुदान कमी पडत आहे. सिमेंटवर होणाऱ्या खर्चामुळे शौचालय बांधणे लोकांना महाग पडत आहे.प्रतिकूल परिस्थिती आणि दुरून आणावी लागणारी पोती यामुळे सिमेंटच्या पोत्यांचा खर्च वाढत असल्याचे सरकारी अधिकारी खासगीत कबूल करत असले तरी यावर उपाय करणे टाळले जात आहे. देशात सगळीकडे 400 रुपये दराने सिमेंटचे पोते मिळते. मात्र अरुणाचल प्रदेशमधील विजयनगरमध्ये आजही आठ हजार रुपये दराने सिमेंटचे पोते विकले जात आहे. या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वप्नातील योजना प्रत्यक्षात आणताना सामान्यांचे खिसे रिकामे होण्याची वेळ आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended