माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने उलघडलं गुपित | MS Dhoni News | Lokmat Marathi News

  • 3 years ago
सध्या भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या फॉर्मवरून त्याला संघात जागा मिळावी की नाही, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनीचं वाढत वय पाहता त्याला टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. 2019 चा विश्वचषक लक्षात घेऊन धोनीने केवळ वन-डे सामन्यांवर आपलं लक्ष केंद्रीत करावं असं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलं होतं. मात्र, सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री हे धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारताला जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिलं होतं. सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत धोनीने आपल्या कर्णधारपदाची संधी कशी मिळाली, याचा खुलासा केला आहे.

” मला कर्णधारपद मिळण्यात अनेक सिनीअर खेळाडूंचा वाटा होता. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मला कर्णधारपद मिळणं हे निव्वळ अशक्य होतं. ज्यावेळी कर्णधारपदासाठी निवड समिती आणि सिनीअर खेळाडूंची चर्चा झाली तेव्हा मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती. पण इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना माझ्यातला प्रामाणिकपणा आणि कठीण परिस्थिती हाताळण्याचं कसब या गुणांमुळे मला कर्णधारपद मिळालं असं मला वाटतं.” असे धोनीने सांगितले. याशिवाय, त्याने काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended