'दशक्रिया' चित्रपटाला ब्राम्हण महासंघाचा विरोध | Marathi Movie Latest Update

  • 3 years ago
पद्मावती' चित्रपटाला होणाऱ्या विरोधाचा वाद देशभर गाजत असतानाच आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाविरोधात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ उभा ठाकला आहे. हा चित्रपट ब्राम्हणांची व हिंदू- प्रथा परंपरांची बदनामी करणारा असून त्याचा प्रदर्शनास मनाई करावी, अशी मागणी महासंघानं केली आहे.
ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केलंय. दिलीप प्रभावळकर यांचा यात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगानं अनेक जुनाट बाबींवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आलंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यामुळे वादळ उठलं आहे. ब्राम्हण महासंघानं या चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट जातिद्वेष पसरवणारा असून सेन्सॉर बोर्डानं त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी महासंघानं केली आहे. याच मुद्यावर महासंघाचे प्रतिनिधी आज पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. सर्व हिंदूत्ववादी संघटनांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाजवळ यावं, अस आवाहनही करण्यात आलं आहे.
ब्राह्मण आणि हिंदूंच्या विरोधात पुस्तकं व सभांमधून सातत्याने गरळ ओकलं जातं. आता चित्रपटांतूनही लक्ष्य केलं जातंय. ब्रह्मणांसह सगळे हिंदू सॉफ्ट टार्गेट आहेत. काही केलं तरी चालत असे वाटत असल्यानं हे प्रकार होत आहेत. याचा विचार झाला पाहिजे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended