पहिलाच चित्रपट आणि करावी लागली 'प्लास्टिक सर्जरी' पहा आहे कोण ? | Abhay Mahajan Latest Updates

  • 3 years ago
डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ या सिनेमातील अभिनेता अभय महाजनसोबत घडली.
नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता की, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहअभिनेत्री प्रिया बापटसोबत एक दृश्य चित्रीत करीत असताना, अभयचा तोल गेला आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला.स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिल्यामुळे बेसावध असलेल्या अभयला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोचदेखील पडली होती. जखम अधिक खोल असल्याकारणामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, चित्रीकरणाचा तिसराच दिवस असल्यामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होता. त्यामुळे अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये म्हणून अभयच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात आली

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended