“ वाजले कि बारा” ह्या शीर्षकाखाली ट्विटरवर Nitesh Narayan Rane यांची वादग्रस्त पोस्ट पहा व्हिडिओ |

  • 3 years ago
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, एक जादुई व्यक्तिमत्व होते, ते नेते होते, संपादक होते, आणि महत्वाच
म्हणजे ते व्यंगचित्रकार होते. त्यांच्या हातून व्यंगचित्रे अगदी लीलया तयार होत असत आणि त्या
माध्यमातून ते अनेकांवर टीका करत असत, परंतु आता हाच खेळ त्यांच्या चिरंजीवांबरोबर खेळला
जातोय. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या मुशीतून तयार झालेले नारायण राणे ह्यांचे चिरंजीव नितेश राणे
ह्यांनी एक व्यंगचित्र “ वाजले कि बारा” ह्या शीर्षकाखाली ट्विटरवर पोस्ट केले आहे. महारष्ट्रात नारायण
राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात प्रवेशामुळे दोन्ही मित्रपक्षातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या भेटीने उद्धव ठाकरे यांची झोप उडाल्याच्या
आशयाचे हे व्यंगचित्र आहे. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कडून ह्याला काय उत्तर दिले जाते हे पाहणे
रोचक ठरेल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended